तरडगाव: विजेच्या खांबाला चिकटून अपघात – एक जण गंभीर जखमी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान तरडगाव येथे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे एका व्यक्तीला विजेचा धक्का लागला. यात तो गंभीर जखमी झाला आहे.

स्थैर्य, तरडगाव, दि. 17 जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामादरम्यान तरडगाव येथे एका कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका विजेच्या खांबाला चिकटून एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तरडगाव येथून फलटणकडे मार्गस्थ झाला आहे. पालखीच्या मुक्कामादरम्यान तरडगावमध्ये कंत्राटदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विजेच्या खांबाला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने एका व्यक्तीला जोरदार धक्का बसला. यामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच उपस्थित नागरिकांनी जखमीला तत्काळ तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथमोपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे पालखी मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Back to top button
Don`t copy text!