नागरिकांना मोठा दिलासा; तरडगाव आणि दहिवडीत दरमहा भरणार आरटीओ कॅम्प

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्यातून तरडगाव आणि दहिवडीत आरटीओ कॅम्प सुरू होणार आहे. यामुळे वाहनचालकांचा फलटणचा हेलपाटा वाचणार असून वेळेचीही मोठी बचत होणार आहे.

स्थैर्य, तरडगाव, दि. १३ ऑक्टोबर : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार आणि आमदार सचिन पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तरडगाव (ता. फलटण) आणि दहिवडी (ता. माण) येथे दरमहा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) कॅम्प भरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, तरडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रशांत गायकवाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

कॅम्पचे ठिकाण आणि वेळापत्रक

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत नागरिकांना तत्पर व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी हा कॅम्प आयोजित केला जाणार आहे. तरडगाव येथील पालखी तळावर दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी हा कॅम्प भरेल. तसेच, दहिवडी येथील नगरपंचायत परिसरात दर महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी अतिरिक्त आरटीओ कॅम्पचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांना मिळणार या सुविधा

या कॅम्पमध्ये नवीन शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स), पक्के ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी, ट्रॅक्टर आणि शेतीपयोगी वाहनांची नोंदणी, तसेच खाजगी वाहनांचे नोंदणी नूतनीकरण (RRC) आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष उभारण्यात येणार आहे. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी फलटण मुख्यालयात न जाता या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!