फलटण नगरपालिकेत किरीट सोमय्या यांची जन्म-मृत्यू नोंदणी चौकशी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

किरीट सोमय्या यांनी फलटण नगरपालिकेत जन्म-मृत्यू नोंदणीची चौकशी करत घुसखोरांवर कडक कारवाईचा निर्धार व्यक्त केला व मुख्य सचिवांना निर्देश दिले.

स्थैर्य, फलटण, दि. 26 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फलटण नगरपरिषद येथे जन्म-मृत्यू विभागाची सखोल चौकशी करत जन्म-मृत्यू नोंदणीची संपूर्ण माहिती घेतली आहे. राज्यामध्ये विविध ठिकाणी अवैध जन्म प्रमाणपत्र वाटपाच्या प्रकरणावरून जन्म-मृत्यू नोंदणी विभागात प्रशासकीय गोंधळ नसून देशाच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भूमिका आणि कारवाईचा निर्धार

याप्रकरणी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेचे किरीट सोमय्या यांनी स्वागत केले असून, बोगस प्रमाणपत्रे मिळवून देशात राहणाऱ्या घुसखोरांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

नोंदणी अडचणी आणि मुख्य सचिवांना फोन

जन्म-मृत्यू नोंदणीच्या वेळेस येणाऱ्या अडचणींची माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी किरीट सोमय्या यांना दिली. यामध्ये जुन्या दाखल्यांच्या अडचणींच्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी थेट राज्याच्या मुख्य सचिवांना फोन लावून या प्रक्रियेत सुलभता आणण्याचे निर्देश दिले आहेत.

सुरक्षेचा इशारा

जन्म प्रमाणपत्र हा देशाच्या सुरक्षेचा पाया असून, ज्यांचा जन्म येथे झाला नाही अशांना खोटे दाखले देऊन नागरिकत्व मिळवून देणे हे धोक्याचे आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत, मग तो बांगलादेशी असो किंवा रोहिंग्या, अशांना शोधून काढून परत पाठवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!