फलटण येथे उद्या तालुकास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण तालुकास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन मंगळवार, दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंची निवड सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी करण्यात येईल. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजयी खेळाडूंची निवड महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी होईल.

महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप २०२३ ही स्पर्धा दि. ४ व ५ मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ग्राऊंड, कोल्हापूर येथे होणार आहेत. त्याच्या अनुषंगाने फलटण तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे निवड स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

फलटण तालुकास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा ८ वर्षे मुली – मुले, १० वर्षे मुली – मुले, १२ वर्षे मुली – मुले या गटामध्ये खेळवण्यात येतील. स्पर्धेमध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक व रिले या स्पर्धा घेण्यात येतील. तरी फलटण तालुकास्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन फलटण तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!