
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । फलटण । श्रीमंत अनंतमालादेवी (बाईसाहेब महाराज), श्रीमंत वसुंधराराजे, श्रीमंत भारतीदेवी या राजघराण्यातील जेष्ठ व्यक्तींचे गेल्या वर्षांमध्ये निधन झालेले आहे. त्यासोबतच कोरोना महामारीमुळे आपण ज्या आपल्या जिवलगांना मुकलो आहोत, त्यामुळे उद्या दि. २३ डिसेंबर रोजी साजरा होत असलेला माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही. आपण सर्वानी स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी; ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील, असे मत पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलेले आहे.
