स्विकार मेहता व किरण भोसले यांना अपकमिंग अँड प्रॉमिसिंग आर्किटेक्चर अँड इंटेरिअर डिजाईन ऑफ इयर २०२० (रेसिडेंशियल डिजाईन) या पुरस्काराने सन्मानित


 

आर्किटेक्ट स्वीकार मेहता यांना आर्किटेक्ट लीना कुमार व आर्किटेक्ट किरण भोसले यांना आर्किटेक्ट डॉ. अजय चंद्रन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि.२: बंगळुरु येथे झालेल्या नॅशनल आर्किटेक्चर व इंटेरिअर डिजाईन एक्सलन्स अवॉर्ड २०२० पारितोषिक वितरण समारंभात द केन ग्रुप, पुणेचे आर्किटेक्ट स्विकार मेहता व आर्किटेक्ट किरण भोसले यांना अपकमिंग अँड प्रॉमिसिंग आर्किटेक्चर अँड इंटेरिअर डिजाईन ऑफ इयर २०२० (रेसिडेंशियल डिजाईन) या पुरस्काराने आर्किटेक्ट लीना कुमार व आर्किटेक्ट डॉ. अजय चंद्रन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

बिगीन अप रिसर्च इंटेलिजन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने ताज वेस्ट एन्ड बंगळुरु येथे या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. प्रशस्तीपत्र व सन्माचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून या वर्षातील सलग तिसऱ्या पारितोषिकाबद्दल केन ग्रुपचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. आर्किटेक्ट के. जयसिम यांनी समारंभाचे अध्यक्षपद भूषविले. डॉ. आनंद नाईक यांनी समारोप व आभार व्यक्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!