राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धेच्या वडूज येथील जुळ्या बहिणींचे सुयश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. ०९ : शिवाजी भोसले येज्यूवर्ल्ड युट्यूब चॅनेल आयोजित राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत वडूज (जि.सातारा) येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीनी असलेल्या कु.शिवांजली अतुल जगताप व कु.स्वरांजली अतुल जगताप या जुळ्या बहिणींनी राज्यात चौथा क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून व इतर राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमुळे स्पर्धक महाराष्ट्रात घराघरात पोचले व त्या स्पर्धकांना त्यांचे कलागुण सादर करण्याचा मंच मिळाला. या स्पर्धेचा निकाल तयार करताना स्पर्धेला मिळालेले व्हिवूज व परीक्षकांचे गुण त्यानुसार हा निकाल तयार करण्यात आलेला आहे. स्पर्धेदरम्यान कु.शिवांजलीला 1560 व्हिवूज आणि 379 लाईक्स तर कु.स्वरांजलीला 1580 व्हिवूज आणि 376 लाईक्स मिळाले.

या यशाबद्दल कु.शिवांजली व कु.स्वरांजलीचे कौतुक होत असून सदर स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका देशमुख व वर्गशिक्षक इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!