उत्सवी मोसमासाठी सूर्या रोशनीची लाइटिंग सिरीजची नवीन श्रेणी


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । मुंबई । सूर्या रोशनी या भारतातील लाइटिंगसाठी सर्वात आदरणीय व विश्वसनीय ब्रॅण्डने दिवाळी सीझननिमित्त त्यांच्या लाइटिंग सिरीजमध्ये तीन नवीन उत्पादनांच्या लॉन्चची घोषणा केली. गोव्यामध्ये सुरू असलेल्या ट्रेड मीटदरम्यान त्यांच्या टॉप डिलर्सकडे या उत्पादनांचे अनावरण करण्यात येणार आहे. दिवाळी सण झगमगाट व आनंदासह साजरा केला जातो, ज्यामुळे सूर्या रोशनीने त्यांच्या चमकणा-या दिव्यांच्या आकर्षक श्रेणीसह रस्ते, तसेच घरांना प्रकाशमय करण्यासाठी सणापूर्वीच उत्सवी उत्साहाची भर करण्याची योजना आखली आहे.

सूर्या रोशनीच्या कन्झ्युमर लाइटिंगचे व्यवसाय प्रमुख गिरीश बीओ म्हणाले, “दिवाळी सण दुष्टावर सुष्टाच्या विजयाचे प्रतीक आहे. दोन वर्षांनंतर आपण सामान्य स्थितीत परतलो आहोत, म्हणून हे वर्ष आपल्यापैकी अनेकांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. सूर्या रोशनीची सहयोगींचा उत्साह आणि उत्सवी आनंद द्विगुणित करण्याची इच्छा आहे, म्हणूनच आम्ही ही विशेष लाइटिंग उत्पादने लॉन्च करत आहोत.”

  • एस-अल्ट्रा स्लिम: ३ वॅट/ ६ वॅट/ १५ वॅट/ २२ वॅट या वॅटेजमध्ये उपलब्ध जवळपास २५००० तासांपर्यंत कार्यरत राहणारे अल्ट्रा-स्लिम लाइटिंग उत्पादन स्लिमेस्ट एज-लिट डाऊन लाइटर म्हणून सादर करण्यात आले आहे. व्याप‍क फेशिया असलेल्या या किफायतशीर दरामधील उत्पादनामध्ये इन-बिल्ट ड्रायव्हर, व्यापक व्होल्टेज कार्यसंचालन (१३०-३०० व्होल्ट), जवळपास ४ केव्हीपर्यंत सर्ज प्रोटेक्शन आणि १२ अंशाच्या बीम अँगलसह आकर्षक डिझाइन आहे. कोणत्याही जागेला उत्तमपणे प्रकाशित करण्यासाठी हे उत्पादन परिपूर्ण आहे.
  • स्पार्कल रोप लाइट: एसी २२०-२४० व्होल्ट, ५० हर्ट्झ शक्ती असलेली बीआयएस प्रमाणित ४५ मीटर रोप लाइट मीटर अंतरापर्यंतच्या कटसह येते. ज्यामुळे सुलभपणे इन्स्टॉल करता येते. तसेच प्रतिमीटरपर्यंत १२० एलईडी ५६० एलएम प्रकाश देतात, ज्यामध्ये संपन्न लाइट क्वॉलिटीसाठी उच्च रंगसंगती आहे. तुमच्या आवडीचे रेड/ ब्ल्यू/ गीन/ व्हाइट/ वॉर्म व्हाइट या ५ रंगांमध्ये उपलब्ध असलेले हे उत्पादन घरातील लाइटिंग, लॉबीज, रस्त्यांवरील विजेचे खांब किंवा व्यावसायिक इमारती अशा घरातील / घराबाहेरील सजावटीसाठी अनुकूल आहे.
  • झग-मग (फेस्टिव्ह स्ट्रिंग लाइट): बीआयएस प्रमाणित १० मीटर लांब (४६ एलईडींसह) मल्टीकलर लाइटमध्ये अद्वितीय कॉन्केव्ह एलईडी आहे, ज्यामध्ये झीरो ग्लेअर व ३६०-डिग्री व्ह्यू अँगल आहे. उपयुक्त व टिकाऊ लाइटिंग अधिक ब्राइटनेस देते, ज्यामुळे यंदाच्या सणासुदीच्या काळात झगमगाट करण्यासाठी ही लाइट अनुकूल आहे.

Back to top button
Don`t copy text!