
थेट WhatsApp वर मिळवा
धर्म बदलल्यानंतर मागील सामाजिक स्थितीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मागता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतरित व्यक्तींच्या आरक्षणाबाबतचे निकष स्पष्ट केले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. १६ ऑक्टोबर : हिंदू सामाजिक रचनेतून अन्य धर्मात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना केवळ जुन्या सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने हा निकाल देत मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
मागासलेपण पुढे चालवता येणार नाही
एका धर्मातून दुसऱ्या धर्मात गेल्यानंतर मागील सामाजिक घटकांचे मागासलेपण नव्या धर्मात आरक्षणासाठी गृहीत धरले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. धर्मांतरानंतर व्यक्तीची पूर्वीची जात आणि कायदेशीर ओळख बदलत असल्याने आरक्षणाचे लाभ पूर्ववत लागू होत नाहीत. न्यायालयाने राज्य सरकारचे अपील फेटाळून लावत हा निकाल दिला आहे.





