राज्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; MPSC ची पूर्व परीक्षा नियोजित तारखेलाच झाली पाहिजे


स्थैर्य, फलटण, दि. १२ : राज्यात MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला असताना भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. “असं केल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे”, असं देखील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले आहेत. १४ मार्च रोजी MPSC ची पूर्व परीक्षा नियोजित असताना अचानक आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं. राज्यात MPSC ची पूर्वपरीक्षा पूर्व नियोजित तारखेला होण्यासाठी जे विद्यार्थी व विद्यार्थींनी आंदोलन करीत आहेत, त्या सर्वांना आपला पाठिंबा आहे, असे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना MPSC ची पूर्वपरीक्षाबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण नगरपालिकेचे नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका सौ. मदलसा कुंभार, नगरसेविका सौ. मीना नेवसे, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, भाजपा युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुशांत निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजकीय पक्षांच्या रॅली चालू आहेत. आंदोलनं चालू आहेत. आम्ही सगळेच पक्ष आपापले कार्यक्रम करत आहोत. सत्तापक्षाच्या ट्रॅक्टर रॅली होत असतात. परीक्षेमध्ये तर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात असतं. सरकारने दिलेलं करोनाचं कारण अतिशय तकलादू आहे. त्यामुळे या कारणामुळे परीक्षा रद्द करणं अतिशय चुकीचं होईल. आता जे विद्यार्थी व विद्यार्थींनी संपूर्ण राज्यात आंदोलनास बसले आहेत त्यांना आपला जाहीर पाठिंबा असून राज्य सरकारने या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घ्यायला हव्यात, अशी देखील प्रतिक्रिया खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

भाजपा भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे फलटण तालुका अध्यक्ष सुनील जाधव, महिला मोर्चाच्या फलटण तालुका अध्यक्ष सौ. उषा राऊत, फलटण शहराध्यक्ष सौ. विजया कदम, अमीत रणवरे, निलेश चिंचकर, नाना आडके, राहुल शहा, प्रसाद शिंदे, संजय गायकवाड व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!