
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २८ मार्च : फलटण येथील नामांकित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुमन विनायक बडबडे (वय ८४ वर्षे) यांचे शुक्रवार, दिनांक २७ मार्च रोजी अल्पशा आजाराने वसई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक शिस्तप्रिय आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना फलटण परिसरात व्यक्त केली जात आहे.
सुमन बडबडे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये आदर्श शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम करताना हजारो विद्यार्थी घडवले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि शैक्षणिक कार्यामुळे त्या विद्यार्थी व शिक्षक वर्गात अत्यंत लोकप्रिय होत्या.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
