सातारा जिल्ह्यातील पडळ बनले ‘सुकन्या समृद्धी गाव’; भारत सरकारच्या योजनेस 100 टक्के प्रतिसाद


 

स्थैर्य, कातरखटाव, दि.१५: येथील उपडाकघर कार्यक्षेत्रात असलेल्या पडळ गावाने भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेस 100 टक्के प्रतिसाद दिला असून, सातारा डाकघरचे प्रवर अधीक्षक अपराजिता म्रिधा यांच्या हस्ते या योजनेच्या खातेधारक मुलींना पासबुक वितरण करण्यात आले. 

पडळ येथील पोस्टमास्तर उत्तम सानप यांनी दहा वर्षांच्या आतील मुलींसाठी असणारी शासनाच्या सुकन्या समृद्धी योजना, डाकघर हे बॅंकेप्रमाणे कशाप्रकारे काम करते याची माहिती दिली. त्यानुसार नागरिकांनी सुकन्या समृद्धी योजनेस प्रतिसाद देत सर्व लहान मुलींची सुकन्या समृद्धी योजनेची खाती सुरू केली. याकामी डाकवितरक अशोक जाधव, डाकवाहक नारायण परीट यांची मदत मिळाली. 

अपराजिता म्रिधा यांच्या हस्ते व वडूज उपविभागाचे डाकनिरीक्षक धनेश यादव, वडूजचे डाकआवेक्षक डी. के. जाधव यांच्या उपस्थितीत नवीन खातेधारक मुलींना पासबुक वितरण झाले, तसेच पडळ गाव संपूर्ण सुकन्या समृद्धी गाव म्हणून घोषित करण्यात आले. पडळच्या उपसरपंच रंजना सानप व राजश्री सानप यांच्या हस्ते अपराजिता म्रिधा यांचे स्वागत झाले. उत्कृष्ट काम केल्याबद्दल उत्तम सानप, अशोक जाधव, नारायण परीट यांचे कौतुक करण्यात आले. या वेळी सिद्धनाथ सानप, प्रकाश सानप, उमेश जाधव, पांडुरंग सानप- पाटील, महादेव सानप, दिलीप नलवडे, मोहन वण्णे, शुभम सानप उपस्थित होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!