एकरी १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य – कृषिरत्न डॉ संजीव माने


दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । सातारा । ऊसाचे शास्त्रशुध्द  नियोजन केले तर एकरी 125 टन ऊस उत्पादन घेणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी कृषिरत्न डॉ संजीव माने  यांनी केले ते  निसराळे येथिल कृषि विभाग आत्मा व कृषि मित्र शेतकरी गट आयोजित  एकरी 125 टन ऊस  उत्पादन स्पर्धा अभियान शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी कोल्हापूर विभागीय कृषि सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषि अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषि अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ  उपस्थित होते.

श्री. माने  म्हणाले, की ऊसाच्या विक्रमी उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता, ऊस लागवडीची योग्य पध्दत ; माती परीक्षणनुसार  रासायनिक खतांच्या योग्य मात्रा ;  ठिबकसिंचनांतून पाणी व्यवस्थापन आणि एकात्मिक किड रोग व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास  एकरी 125 टन ऊस उत्पादन घेणे सामान्य शेतकऱ्याला  सुध्दा सहज शक्य आहे.

या कार्यक्रमात विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी  ऊस उत्पादन  वाढ अभियान स्पर्धा ही नावीन्यपूर्ण बाब असून  शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेण्याविषयी आवाहन केले .जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी स्पर्धेत सहभागी 112शेतकऱ्यांचे  अभिनंदन करून स्पर्धा अंमलबजावणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले . उपविभागीय कृषि अधिकारी गुरुदत्त काळे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रकिया योजना विषयी मार्गदर्शन केले.

या ऊस पिक स्पर्धेतून पहिले  तीन  क्रमांक येणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिस म्हणून तुषार संच, खत बियाणे  टोकण यंत्र,  बॅटरीचलित फवारणी पंप , तसेच सहभागी सर्व शेतकऱ्यांना  सूक्ष्मअन्नद्रव्ये व जैविक खते बक्षिस म्हणून देण्याचे रिवुलिस इरिगेशन, साई इंडस्ट्रिज ,अग्रिनिर मशनरि,आर सी एफ  कंपनीने  या कार्यक्रमात जाहीर केले.

कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी युवराज काटे   सरपंच नारायण खामकर  उपसरपंच सुशीला घोरपडे; कृषि पर्यवेक्षक  रोहिदास तीटकारे, अनिल यादव आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश नलावडे,  नीलम घोरपडे  प्रशांत कुलकर्णी  उमेश जाधव , प्रगतशील शेतकरी श्रीमंत घोरपडे ; अंकुश घोरपडे सचिन घोरपडे, भगवान गायकवाड,   श्रीकांत घोरपडे, कृषि विभागाचे सर्व अधिकारी , कृषि सहाय्यक पर्यवेक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि सहायक अंकुश सोनावले यांनी केले  तर आभार  विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार देशमुख यानी मानले.


Back to top button
Don`t copy text!