
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२४ | फलटण |
फलटण येथील सुधीर चिंतामणी अहिवळे सर यांची मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी निवड झाली आहे.
अहिवळे सर यांचा फलटण येथील दोन नंबर प्राथमिक शाळेपासून सुरू झालेल्या शैक्षणिक प्रवासात माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल येथे पूर्ण करून त्यांनी उच्च शिक्षण मुधोजी महाविद्यालय फलटण येथे पूर्ण केले. त्यांनी शिक्षण शास्त्रात पदवी घेतल्यानंतर फलटण एज्युकेशन सोसायटीच्या याच संस्थेमध्ये शिक्षणाचं पवित्र कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली.
मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे फलटणमधील अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक मान्यवरांसह त्यांच्या मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.
