वैद्यमापनशास्त्र भरारी पथकाची श्री दत्त इंडिया प्रा.लि., साखरवाडी साखर कारखान्यास अचानक भेट; तपासणीत सर्व वजनकाटे बरोबर असल्याचे केले स्पष्ट


दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२३ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) येथील श्री दत्त इंडिया साखर कारखान्यास वैद्यमापनशास्त्र भरारी पथकाने २ मार्च रोजी दुपारी २.०० वाजता अचानक भेट दिली. यावेळी पथकाने ऊस वजनकाटा विभागाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सहा ते सात उसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टरची इलेक्ट्रॉनिक स्केलवर प्रमाणित वजनाची व डेटवेटच्या सहाय्याने नियमाप्रमाणे तपासणी केली असता सर्व वजनकाटे बरोबर व अचूक असल्याचे स्पष्ट केले.

या भरारी पथकात पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, फलटणचे तहसीलदार समीर यादव, लेखापरीक्षक ए.सी. शिरतोडे, वैद्यमापनशास्त्र फलटण विभागाचे रा. पा. आखरे, पुरवठा निरीक्षक मनोज काकडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, शेतकरी संघटना प्रतिनिधी धनंजय महामुलकर, सचिन खानविलकर यांचा सहभाग होता.

श्री दत्त इंडिया प्रा.लि., साखरवाडी कारखान्याचे वजनकाटे बरोबर आढळले असल्याचे या भरारी पथकाने यावेळी सांगितले. श्री दत्त इंडिया साखर कारखाना शेतकर्‍यांचे हित पाहून हंगाम २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ६२१६४५ मे.टन उसाचे बिल रक्कम रु. १७२ कोटी ३१ लाख ९९ हजार १८९ रुपये दि. २८ फेब्रुवारीपर्यंचे संपूर्ण ऊसबिल एकूण १००५४ शेतकर्‍यांना अदा केले आहे.

या भरारी पथकाच्या भेटीमुळे श्री दत्त इंडिया प्रा.लि., साखरवाडी या साखर कारखान्यास पुरवठा करणार्‍या सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!