दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२४ | फलटण |
सुरवडी, ता. फलटण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. विद्यालयातील ईश्वरी शाम सटाले या विद्यार्थिनीची माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे, तर सृष्टी दीपक जाधव आणि सारिका सचिन शिंदे या दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्या आहेत.
सन २०२०-२१ मध्ये कु. ईश्वरी हिने न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी येथे इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतला. तिने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जिद्दीने प्रयत्न करून हे दैदीप्यमान यश मिळविले आहे. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या यशस्वी विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे स्थानिक स्कूल कमिटी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, शालेय व्यवस्थापन विकास समिती, सुरवडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटी सुरवडी, गुरुकुल शिक्षक पालक संघ, शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पंचक्रोशीतील पालक यांनी अभिनंदन केले आहे.