‘युवोत्सव सातारा’ स्पर्धेत फलटणच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे यश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
श्रीनिवास पाटील फाउंडेशन सातारा आयोजित ‘युवोत्सव सातारा’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणचे विद्यार्थी कु. सानिया शेख, कु नंदिनी पवार व अजय केसकर दाखल झाले होते. दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सातारा येथे अंतिम फेरी संपन्न झाली. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कु.नंदीनी महेंद्र पवार -निबंध स्पर्धा विजेतेपद, सानिया शफिक शेख- वक्तृत्व स्पर्धा उपविजेतेपद, अजय पोपट केसकर – एकलगायन स्पर्धा उपविजेतेपद पटकावून या स्पर्धा प्रकारांमधून यश संपादन केले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी.नार्वे यांनी दिली.

या विद्यार्थ्यांचे विधान परिषदेचे माजी सभापती तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. नार्वे, उपप्राचार्य मिलिंद नातू, सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. चंद्रकांत गोरड यांनी अभिनंदन केले.

Back to top button
Don`t copy text!