
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण दि.२४: येथील कवडे क्लासेसचा विद्यार्थी संकेत वाघ याने सन 2020 मध्ये झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत उज्वल यश संपादन केले असून प्रतिक्षा यादीतून जवाहर नवोदय विद्यालय, पुणे (शिक्रापूर) येथे त्याची निवड झाली आहे.
सन 2020 वर्षात कवडे क्लासेसच्या एकूण 8 विद्यार्थ्यांची निवड झाली असून यानिमित्ताने कवडे क्लासेसच्या शिरपेचात आणखीन एक यशाचा तुरा लागला आहे.
