
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महिला महाविद्यालय, कराड येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय बुध्दीबळ पुरूष स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक संपादन केला.
या संघामध्ये चैतन्य मोरे, मनीष होवाळ, वैभव तरटे, शशांक जाधव, प्रतीक नाळे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे अधिकारी, प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
