भारतीय किसान संघ साताराचा अभ्यास वर्ग संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ मे २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथून पुढे प्रयत्न करणे, ही काळाची गरज असून सर्व शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी इथून पुढे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य ते नियोजन करून लवकरच त्यावर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले जातील व त्याची माहिती वेळोवेळी ग्रुपवर दिली जाईल, असे सातारा येथे १ मे रोजी झालेल्या अभ्यास वर्गात भारतीय किसान संघाच्या सदस्यांनी मते मांडली.

या अभ्यासवर्गात संपूर्ण देशातील शेतकर्‍यांना फायदा होईल, अशा पद्धतीचे भारत सरकारचे आयात निर्यात धोरण व्हावे, तसेच यासंदर्भात शेतकर्‍यांना फायदा होण्यासाठी या धोरणामध्ये केंद्र सरकारने कोणत्या योजना राबवाव्यात व कोणते बदल करणे अपेक्षित आहे, या विषयावर किसान संघाच्या सदस्यांनी मते मांडली.

शेतकर्‍यांना कृषी शेतमाल निर्यातीबाबत येणार्‍या अडचणी व त्यांचे प्रश्न, तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या जावू शकतात, याबाबतही सर्वांच्या समोर मते मांडण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!