इस्रो, नासामध्ये निवड झालेल्या विद्यार्थीचा वंजारवाडीमध्ये सत्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

वंजारवाडी – येथे जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थी व मान्यवर.
दैनिक स्थैर्य । 5 ऑगस्ट 2025 । बारामती ।वंजारवाडी (ता. बारामती) येथे ग्रामपंचायत वंजारवाडी व स्नेहबंध प्रतिष्ठानच्यावतीने इस्रो आणि नासा निवड चाचणी परीक्षेच्या द्वितीय राऊंड मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व 10 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत वंजारवाडीच्यावतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शहा, सचिव सौ. अनिता काटकर, सौ. स्मृती शिंदे, मेजर अनिल कायगुडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सरपंच जगन्नाथ वणवे, उपसरपंच सौ. चिन्मयनंदा चौधर, मुख्याध्यापिका सौ. सुरेखा भालेराव सागर दराडे, डॉ. युवराज जराड पाटील, गोरख चौधर यांनी केला. तसेच ग्रामपंचायत वंजारवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी निलेश लव्हटे, पोपट चौधर, संतोष चौधर, सौ. ज्योती वणवे, संतोष चौधर, अशोक सूर्यवंशी, ग्रामस्थ पोपट जगताप, संदीप मालुसरे, व ग्रामस्थ उपस्थितत होते. सचिन वणवे आणि सौ अभिजीता जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. वनिता भुतकर यांनी आभार मानले.

 

Back to top button
Don`t copy text!