कोशिंबळे – तळे येथे निसर्गमित्र गटाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन


दैनिक स्थैर्य | दि. 22 जुन 2024 | तळे | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोशिंबळे – तळे येथे कृषी महाविद्यालय दापोली अंतर्गत ग्रामीण कार्यानुभवासाठी आलेल्या निसर्गमित्र गटाच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी आंतरराष्ट्रीय योगा दिवसाला उपस्थित होते. सकाळी 8 वा. शाळेच्या वर्गात शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

वैभव फुलसुंदर व सौरभ शेडगे यांनी या सर्वांना योगाभ्यास शिकवला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने शिकवलेले योग पूर्ण केले.

यावेळी विद्यार्थ्यांना योगासनाचे बकासन, मयुरासन, शिर्षासन, धनुरासन असे वेगवेगळे प्रकार प्रत्येक्षात करून दाखवण्यात आले व ही योगासने केल्याने होणारे फायदे म्हणजे फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. फक्त तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत असे आवाहन प्रतीक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले व सतत योगा करण्यास प्रोत्साहित केले.

योग दिवस यशस्वी करण्यासाठी निसर्गमित्र लक्ष्मण माळगी, जीवन गोडसे, वैभव फुलसूदर, सुमेध वाकळे, पार्थ गूरसाळे, अनिकेत काजरेकर, अनीष जगताप, आकाश जाधव, ऋषभ मोरे, प्रतीक चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!