फलटणमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा


दैनिक स्थैर्य | दि. 22 जुन 2024 | फलटण | तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या “सारथी” संस्थेचे निबंधक तथा अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, महाराष्ट्र शासनाच्या “सारथी” संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी अनिल पवार व अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक मयूर घोरपडे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.

फलटण तालुक्यासह सातारा, सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. मार्गदर्शन मेळाव्यासाठी उपस्थित राहताना संपूर्ण परिवारासह विद्यार्थ्यांनी सोमवार, दि. 24 जुन रोजी सकाळी 10 वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे मार्गदर्शन मेळाव्यास उपस्थित रहावे; असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मराठा समाजातील जे विद्यार्थी हनी दहावी व बारावी मध्ये प्रथम श्रेणीत म्हणजेच 80% हुन अधिक गुण मिळवले आहेत. यासोबतच NEET व CET परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. त्यासाठी येताना मार्कशिटची व इतर कागदपत्रांची झेरॉक्स प्रत मराठा क्रांती मोर्चाच्या फलटण येथील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्यांना समक्ष कागदपत्रे जमा करता येणार नाहीत त्यांनी ९८२३४१६७४२, ७०२०६६८६१६, ९९७५१९२६२६, ९८२२५४११०४, ९७६६५१३१४३, ९२२६९२३००१, ८५५१९७११७७, ७४००७२५७४३ सदरील मराठा समन्वयक यांच्याकडे WhatsApp द्वारे जमा करावीत.


Back to top button
Don`t copy text!