
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, वडूज, दि. २०: सध्या राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाने पुन्हा डोके वॉर काढलेले आहे. सर्व सामान्य नागरिक वापरण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहेत. सध्या कोरोनावर जर आपल्याला जिंकायचे असेल तर मास्क परिधान करणे आवश्यकच आहे. वडूज शहरामध्य फिरताना जे नागरिक मास्क परिधान करीत नाहीत त्यांच्यावर आता कारवाई करताना वडूज पोलिस प्रशाशन करीत आहेत. तरी आगामी काळामध्ये कोरोनाला दोन हात करण्यासाठी मास्कचा वापर कडून बाहेर असताना सुरक्षित अंतर ठेवावे. दुकानांमध्ये जास्त देऊ नये, आपल्या सोबत सर्वांचीच काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन प्रशाशनाकडून करण्यात आलेले आहे.
