कोरोना प्रतिबंधात्मक उपाय मोडणाऱ्यांवर या पुढे कडक कारवाई : डॉ. शिवाजी जगताप; फलटणला कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर प्रांताधिकारी यांची कडक कारवाई


स्थैर्य, फलटण, ०४: सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार फलटण शहरामध्ये फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्या पथकाने फलटण शहरामध्ये विविध दुकानांवर कारवाई करण्यात आली व सदरील दुकाने सात दिवसांसाठी बंद करण्यात आलेली आहेत. फलटण शहरासह तालुक्यामध्ये जे नागरिक अथवा दुकानदार कोरोनासंदर्भातील प्रतिबंधक उपाय योजना अंतर्गत नियम पाळणार नाहीत. तसेच जे दुकानदार सोशल डिस्टंसिंग पाळणार नाहीत. यांच्यावर यापुढे देखील कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

शनिवार दि. ०३ मार्च २०२१ रोजी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या संयुक्त पथकाने फलटण शहरामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेल्या आदेश मोडल्याने अरविंद क्लॉथ सेंटर, सम्राट इलेक्ट्रॉनिक्स, सुरभी टी सेंटर, भुसार किरणा होलसेल दुकान यांच्यावर कारवाई करण्यात आली. या दुकानामध्ये सोशल डिस्टंसिंग वापर न केल्यामुळे तसेच गर्दी जमा केल्यामुळे सदर चार दुकानांवर पुढील आदेशापर्यंत सात दिवसाकरीता बंद करण्यात आले आहे.

तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये चार दुकानांसह एक बँक तसेच ०९ व्यक्ती यांच्याकडून रक्कम रुपये सात हजार एवढा इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!