
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १८ जुन २०२२ । फलटण । राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजलेला आहे. त्यानुसार नगरपरिषद निवडणूकीचे कामकाज सुरू आहे. तरी त्यामध्ये माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे प्रशासनावर दबाव आणत असल्याचा अक व्हीडीओ नुकताच व्हायरल झाला. त्यानुसार प्रशासनावर दबाव निर्माण होत असल्याचे चित्र तयार होताना दिसत आहे. तरी नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा होणारा हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी फलटण तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे संघटन सचिव निखील पाटील यांनी केलेली आहे.
याबाबतचे सविस्तर निवेदन निखील पाटील यांनी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रसासक संजय गायकवाड यांच्याकडे सादर केलेले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करून योग्य ते निर्णय घ्यावेत असेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
