
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.३: देगाव, ता. सातारा येथे शेतातील सोयाबीन पिकाचे चोरी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश हणमंत कुंभार व प्रदीप बबन कुंभार अशी देगाव अशी संशयीतांची नावे आहेत. दिलीप हणमंत कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे देगाव येथील शेतात सोयाबीनचे लागवड केली आहे. दोन्ही संशयीतांनी लबाडीने त्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक चोरून नेले. याप्रकरणी दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार मुलाणी तपास करत आहेत.
