स्थैर्य, सातारा, दि. १८: येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अपुरा वैद्यकीय स्टाफ असल्याने आणि अद्ययावत यंत्रणा नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाने याबात तातडीने लक्ष घालावे, तसेच कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत भाजपचे शहरप्रमुख विकास गोसावी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अनेक बाबतीत रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयात 4 स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. शिशू अतिदक्षता विभागात स्टाफ फक्त सहा आहे. याशिवाय फक्त एक जनरेटर, इमरजन्सी अॅम्ब्लून्सही एकच आहे. एनआयसीयूमध्येही चारच व्हेंटीलेटर आहेत. अग्नीशामक दलाचे लायसन्स नाही, याबाबत तातडीने हालचाली कराव्यात आणि कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करावी आणि सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.