सायलेन्सरचा धक्का लागल्यावरून दमदाटी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 


स्थैर्य, सातारा, दि. १६: येथील खेड फाटा येथे गाडीचा सायलेन्सर आपल्या गाडीला लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. दुर्गाप्पा मंजुळे रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार, असे संशयिताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, खेड फाटा येथील टेक्स्ट टाईल कापड दुकानाच्या समोर इम्रान खुदुस कातरकी हे दुचाकीने निघाले होते. त्यांच्या गाडीचा सायलेन्सर पाठीमागून दुर्गाप्पा मंजुळे याच्या गाडीला लागला. या कारणावरून त्याने तक्रारदारास शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी दुर्गाप्पा मंजुळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि ढेकळे करत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!