शालेय अभ्यासक्रमात मोठा बदल; नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार एआयचे धडे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक जागरूकता वाढवण्यासाठी आणि संगणकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंगचे नवे मॉड्युल तयार केले आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २४ ऑक्टोबर : शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटेशनल थिंकिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) नवीन अभ्यासक्रम मॉड्युल विकसित केले आहे. या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय काळापासूनच तांत्रिक शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये

या नवीन अभ्यासक्रमाची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे हे मॉड्युल शिकण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आधीपासून संगणक किंवा एआयचे प्राविण्य असण्याची आवश्यकता नाही. यामध्ये समस्यांची ओळख पटवणे आणि तार्किक पद्धतीने त्या सोडवणे यावर भर देण्यात आला आहे. रोजच्या जीवनात एआयची भूमिका आणि त्याचे कार्य कसे चालते, हे विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने शिकवले जाणार आहे. तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींचा वापर करून हे धडे दिले जाणार असल्याने कमी इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल.

डिजिटल सुरक्षा आणि आशय पडताळणीवर भर

तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांमध्ये नैतिक जाणिवा निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने या मॉड्युलमध्ये डिजिटल सुरक्षा, वैयक्तिक डेटाची गोपनीयता आणि इंटरनेटवर मिळणाऱ्या माहितीची खात्री पटवणे (AI Content Verification) यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी एआयवर अंधपणे विश्वास न ठेवता माहितीची अचूकता तपासण्यास सक्षम व्हावेत, यासाठी हे धडे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!