छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात आनंद निकाळजे लिखित ‘देशाचा बाप’ या कविता संग्रहाचे दिमाखदार प्रकाशन


दैनिक स्थैर्य | दि. १३ मार्च २०२३ | फलटण |
छत्रपती संभाजी महाराज १४ वे साहित्य संमेलन सासवड येथे दि. १२ मार्च २०२३ रोजी प्र. के. अत्रे हॉलमध्ये संपन्न झाले. याप्रसंगी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाळाजी जाधव, हंबीरराव मोहितेंचे १४ वे वंशज संग्रामसिंह मोहिते, अ.भा. मराठी साहित्य संशोधन परिषदेचे अध्यक्ष, महान कवी व लेखक साहित्यिक दशरथराव यादव, साहित्यिक तानाजी जगताप, नेते व साहित्यिक विजयराव कोलते साहेब, राजाभाऊ जगताप, पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक आनंद निकाळजे यांच्या ‘देशाचा बाप’ या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले.

यावेळी कविता संग्रह लेखनाबद्दल आनंद निकाळजे सरांचा शाल, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आनंद निकाळजे सरांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना राज्यातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. गेली २० वर्षे त्यांनी चौफेर साहित्य लेखन केले आहे.

‘खडकावरचे वादळ’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झालेले आहे. ‘देशाचा बाप’ हा कविता संग्रह सहावे पुस्तक असून त्यांच्या पुस्तकांना पद्मश्री लक्ष्मण माने, साहित्यिक तानाजी जगताप यांनी प्रस्तावना दिली आहे. या कविता संग्रह प्रकाशनामुळे निकाळजे सरांचा समाजात सर्वत्र गौरव होत आहे.


Back to top button
Don`t copy text!