गुढीपाडव्यानिमित्त ‘गजानन सुझुकी’तर्फे खास ऑफर्स

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२४ | सातारा |
सातारा येथील गजानन सुझुकीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर देण्यात आली आहे. ‘एक्सचेंज सुविधा’द्वारे कोणतीही दुचाकी घेऊन आल्यानंतर तिला बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळून नवीन सुझुकी गाडी घेण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

गजानन सुझुकीकडून सर्व ग्राहकांसाठी ‘जिक्सर १५० सीसी’ मोटारसायकल खरेदीवर रूपये १० हजारांपर्यंत ‘एक्सचेंज बोनस’ किंवा रूपये ५ हजार ‘कॅश बॅक’ तसेच ८ वर्षांची ‘एक्सटेंडेड वॉरंटी’ फ्री मिळणार आहे. ग्राहकास ‘व्ही-स्ट्रॉम २५० सीसी’ खरेदीवर रूपये २० हजारांपर्यंत ‘एक्सचेंज बोनस’ किंवा १३ हजार रूपये ‘कॅश बॅक’ व ८ वर्षांची ‘एक्सटेंडेड वॉरटी’ फ्री मिळणार आहे. ‘जिक्सर २५० सीसी’ खरेदीवर रूपये १७ हजार ‘एक्सचेंज बोनस’ किंवा रूपये १० हजार ‘कॅश बॅक’, तर ‘सुझुकी अव्हेनीस’ खरेदीवर ‘इन्शुरन्स’ फ्री मिळणार आहे.

गजानन सुझुकीमध्ये सर्व सुझुकी मॉडेल्स ग्राहकांसाठी उपलब्ध असून यामध्ये ‘अ‍ॅक्सेस १२५ सीसी’, ‘अव्हेनीस १२५ सीसी’ ही मॉडेल्स एफआय व एबीएस सिस्टीमसह एसईपी एसओसीएस टेक्नॉलॉजी व विविध कलरमध्ये उपलब्ध आहेत.

दरम्यान, गजानन सुझुकीने गेली १५ वर्षे २५००० पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देत पश्चिम महाराष्ट्रातील सुझुकीचे नामांकित डिलर असा नावलौकिक मिळवला आहे. या ऑफर्सचा नागरिकांनी लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी गजानन सुझुकी, सातारा या शोरूमशी संपर्क साधावा, असे आवाहन गजानन सुझुकीचे संचालक सचिन शेळके यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!