दि. 16 ते 22 जानेवारी या कालावधीत फलटण इंजिनिअरिंग कॉलेजचे जावलीत विशेष श्रमसंस्कार शिबिर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण यांच्या विद्यमाने स्वच्छ भारत – स्वस्थ भारत अभियान या घोष वाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२२-२३ मौजे जावली, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजन केल्याचे माहिती प्रभारी प्राचार्य मिलिंद नातू यांनी दिली.

राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मौजे जावली येथे स्वच्छ गाव समृध्द गाव, शास्वत व सर्वांगीण ग्रामीण विकास, ग्राम सर्वेक्षण व गावचा इतिहास, स्त्री जन्माचे स्वागत व बालविवाह बंदी, व्यसनमुक्ती व आरोग्य सवर्धन, मतदार जनजागृती अभियान, वृक्षारोपण, माती परीक्षण, रस्ता नवनिर्माणकरण, समाज प्रबोधन यासारखे सामाजिक जिव्हाळ्याचे व अभियांत्रिकी संबधित उपक्रम शिबिर कालावधीत गावामध्ये राबविणार असल्याचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मिलिंद नातू यांनी सांगितले.

या शिबिर कालावधीमध्ये तरुण पिढी समोरील आव्हाने व व्यसनमुक्त भारत, स्वच्छ व सदृढ भारत अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती, शाश्वत जगाची निर्मिती, ग्रामीण महिलांचे सबलीकरण, पर्यावरण
सवर्धन व मानवी जीवन, राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान, शेतीपूरक व्यवसाय व ग्रामीण विकास, उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या विविध विषयावर तज्ञांचे व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या या श्रमसंस्कार शिबिरासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

परिसरातील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी तसेच मौजे जावली गावातील ग्रामस्थ विशेष करून महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवुन स्वयंसेवकांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मौजे जावली गावचे सरपंच सौ. ज्ञानेश्वरी मकर, उपसरंपच बाळू गुंडा ठोंबरे यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हे उत्कृष्ट काम करतील असा आशावाद व्यक्त केला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!