
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा दि.२५: मालकी हक्कांच्या सदनिका गृहनिर्माण संस्थांमार्फत मानीव अभिहस्तांतरणा (डीम्ड कन्व्हेअन्स) संदर्भात 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी कळविले आहे.
या मोहिमेंतर्गत सहकारी गृहनिर्मण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संदर्भात सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती करणे, त्यांना कागदपत्रांविषयी आवश्यक माहिती देणे, विहित नमुन्यातील अर्जाद्वारे कन्व्हेअन्स चा प्रस्ताव दाखल करुन घेणे, सर्व पक्षकारांना सुनावणी देणे आणि कन्व्हेअन्स प्रमाणपत्र देऊन जमिनीचा मालकी हक्क संबंधित संस्थेकडे हस्तांतरण याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही जिल्हा उपनिबंधक श्री. आष्टेकर यांनी कळविले आहे.
