सोमंथळी येथील भानुदास सोडमिसे यांचे निधन; पत्रकार तानाजी सोडमिसे यांना पितृशोक


स्थैर्य, सोमंथळी, दि. ४ जून : सोमंथळी (ता. फलटण) येथील दैनिक ‘रोखठोक’चे पत्रकार तानाजी भानुदास सोडमिसे यांचे वडील भानुदास सिताराम सोडमिसे यांचे सोमवारी दुपारी १.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. एक प्रामाणिक, शांत, संयमी, प्रेमळ आणि कष्टाळू शेतकरी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ओळख होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा तानाजी, दोन बहिणी, एक नातू आणि दोन नाती असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोरील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे सोमंथळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून राजकीय, सामाजिक, पत्रकारिता व इतर अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

भानुदास सोडमिसे यांचा रक्षाविसर्जन (सावडण्याचा) आणि दशक्रिया विधी बुधवारी सकाळी ८.३० वाजता सोमंथळी येथील नीरा नदीच्या घाटावर पार पडला.


Back to top button
Don`t copy text!