
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी लघु उद्योजकांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
प्रथम पुरस्कार 15 हजार व द्वितीय क्रमांकास 10 हजार, मानचिन्ह तसेच शाल व श्रीफळ देण्यात येतो. लघु उद्योजकांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं. ए-13, एमआयडीसी, सातारा दूरध्वनी क्रमांक 02162-244655 संपर्क साधावा.
