महामार्गावर खाजगी बसला पाठीमागून ट्रकची धडक बस पलटी सहा जखमी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । वाई । पुणे बंगळूर महामार्गावर पुण्याहून चिपळूणकडे जाणारी खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर बसला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने बस पलटी होऊन सहा प्रवासी गंभीर जखमी झाले.
भुईंज (ता वाई) गावच्या हद्दीत आज दुपारी पुण्याहून चिपळूण कडे जाणाऱ्या खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर बसला पाठीमागून धडक दिली. त्यात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. बसमधून एकोणीस प्रवासी प्रवास करत होते. बस पलटी झाल्याचा मोठा आवाज आल्याने समोरच असलेल्या भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह अपघात स्थळी धाव घेतली. त्यामुळे जखमींना मदत मिळणे शक्य झाले. त्यांनी बस मधून जखमींना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अधिक तपास भुईंज पोलीस करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!