
थेट WhatsApp वर मिळवा
मुंजवडी (ता. फलटण) येथील शिवसेना राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि युवा उद्योजक सिद्धार्थ रणदिवे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
स्थैर्य, फलटण, दि. १० नोव्हेंबर : मुंजवडी (ता. फलटण) येथील युवा उद्योजक आणि शिवसेना राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते सिद्धार्थ छगन रणदिवे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
विविध मान्यवरांची उपस्थिती
सिद्धार्थ रणदिवे यांच्या भाजप प्रवेशावेळी फलटण तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सोमनाथ गावडे पाटील, शरद झेंडे, बाळासाहेब घाडगे, लालासाहेब साळुंखे, सागर ठणके पाटील, अमोल घाडगे आणि अमोल पवार यांचा प्रामुख्याने समावेश होता. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रणदिवे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





