
थेट WhatsApp वर मिळवा
सालपे येथील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
स्थैर्य, फलटण, दि. १० नोव्हेंबर : सालपे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य संतोष कोळपे आणि शिवसेना उपशाखाप्रमुख वैभव कोळपे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी फलटण तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप नेत्यांची उपस्थिती
या पक्षप्रवेशाच्या वेळी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव, भाजपचे सरचिटणीस नानासाहेब कचरे, उपाध्यक्ष शिवाजीराव मसुगडे उपस्थित होते. तसेच सालपे ग्रामपंचायतीचे सरपंच दादासाहेब कोळपे, तंटामुक्ती अध्यक्ष तात्याबा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळपे, युवा नेते दीपक कोळपे आणि चेतन कोळपे यांनीही यावेळी हजेरी लावली.
या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
संतोष कोळपे आणि वैभव कोळपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप कोळपे, दत्ता कोळपे, नितीन कोळपे, गौतम कोळपे, शिवराज कोळपे, संदेश कोळपे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.





