फलटणच्या दोन्ही कन्येचा सन्मान; तरुण नगरसेविका सिद्धाली शहा व सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळ यांचा गौरव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने जगातील सर्वात तरुण नगरसेविका सिद्धाली शहा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता ऋतुजा पिसाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. २१ : फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली शहा आणि आशियाई हॉकी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या खेळाडू कु. ऋतुजा पिसाळ यांचा जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या तरुण नगरसेविका सिद्धाली शहा व सुवर्णपदक विजेता ऋतुजा पिसाळ यांच्या या गौरव सोहळ्यामुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सत्कार सोहळा व मान्यवरांची उपस्थिती

जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभास जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व लायन्स क्लबचे उपप्रांतपाल मंगेश दोशी, पूजाभाभी दोशी, योग व मेडिटेशन कमिटी कन्व्हेनर सविताभाभी दोशी, महिला सबलीकरण कमिटी कन्वेनर स्मिताभाभी शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही गुणवंतांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व मोत्याची माळ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव निना कोठारी, खजिनदार राजेश शहा, उपाध्यक्ष प्रीतम शहा, संगिनी फोरमच्या अध्यक्षा मनिषा व्होरा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, सचिन शहा, सहसचिव हर्षद गांधी, संचालक मिलिंद दोशी, मनिषा घडिया, दादा पिसाळ यांसह बहुसंख्य जैन सोशल ग्रुपचे दम्पती सदस्य उपस्थित होते.

फलटणचे नाव जगात उज्ज्वल

यावेळी बोलताना मंगेश दोशी यांनी कु. सिद्धाली शहा व कु. ऋतुजा पिसाळ यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. या दोन्ही मुलींच्या कर्तृत्वाने फलटणचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले असून आम्हा सर्वांना त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती राजवैद्य यांनी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!