फलटणचे महानुभाव श्याम जामोदेके यांची शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक कार्यकारिणीवर निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२३ । फलटण । शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या प्रथम चरणातील कार्यकारणी विस्तारामध्ये शिवसेना  पक्षाच्या वतीने श्रीचक्रधर स्वामी संस्थान फलटणचे महानुभाव श्याम जामोदेक यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत  श्रीज्ञानेश्वरमहाराज नामदास  संत श्री नामदेव महाराज यांचे वंशज, पंढरपूर  श्री माणिक महाराज मोरे, संत श्री तुकाराम महाराज यांचे वंशज, देहू, श्री पुष्कर महाराज गोसावी संत श्री एकनाथ महाराज यांचे थेट वंशज, पैठण,  सौ. कुंदाताई उगले, कल्याण, श्री अभय प्रकाश जगताप – संत साहित्य अभ्यासक व लेखक, श्री. प्रभंजन महातोले, छत्रपती संभाजीनगर यां आध्यत्मिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या  श्रद्धेय मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे   साहेब यांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी व समस्यांचे निवारण करून भक्कम पाठबळ देण्याकरिता  शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना करण्यात आली.  शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
विशेष म्हणजे यामध्ये  वारकरी संप्रदायातील आद्य तीन संतांच्या थेट वंशजजांचा समावेश आहे. वारकरी संत परंपरेच्या पाईकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिलेला हा जणू आशीर्वादच ही भावना जनमाणसात आहे.

Back to top button
Don`t copy text!