
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : फलटण शहरातील मलठण या भागात राहणारे शुभम थोरात यांची कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचे विविध पदाधिकाऱ्यांकडून व विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
शुभम थोरात हे सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असून त्यांना पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. हे पद मिळाल्यानंतर फलटणसह सातारा जिल्ह्यामध्ये कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना मजबूत करण्यासाठी अग्रेसर राहणार असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले.
