
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । जिल्हा परिषद केंद्रशाळा जावली ता. फलटण येथील उपशिक्षक श्री. शिवाजीराव मोरे यांची कन्या कु. सृष्टी शिवाजीराव मोरे हीने सेट नेट परीक्षेत उज्ज्वल यश संपादित करून तिची रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापिका पदी निवड झाली. या निवडीबद्दल तिचे व मोरे दांपत्य यांचे प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक अनिल शिंदे, माजी संचालक सिकंदर शेख, फलटण तालुका शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष हणमंत चिंचकर , जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण मोरे, विजय शिपटे, सुरेश बाबर , साळवी सर, झेंडे सर व शिक्षक संघाचे कार्यकर्ते यांच्यावतीने अभिनंदन व तिचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे पदाधिकारी व प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
