फलटणची श्रीराम रथयात्रा रद्द; मंदिर परिसरामध्ये कलम १४४ लागू; प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२१ । फलटण । कोरोनाच्या प्राश्वभुमीवर यंदाची श्रीराम रथयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रभु श्रीराम मंदिर परिसरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना डॉ. शिवाजीराव जगताप म्हणाले की, सध्या करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फलटण येथे प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारी श्रीराम रथयात्रा या वर्षी रद्द करण्यात आलेली आहे. परंतु धार्मिक विधी करण्यासाठी यात्रा समितींना परवानगी देण्यात आलेली आहे. प्रतिबंधात्मक आदेश अंमलबजावणीसाठी गजानन चौक ते मंडई पर्यंत बॅरिगेटिंग करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार मात्र कोरोना लसीकरण केले असल्याची तपासणी केली जाणार आहे. रथयात्रा रद्द झाली असल्याने व कोरोना निर्बंधांच्या अनुषंगाने भाविकांनी गर्दी करु नये, असे आवाहन सुध्दा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Back to top button
Don`t copy text!