
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १२ जुलै २०२४ | फलटण |
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण नगरीतून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर फलटण येथील श्रीराम जवाहर साखर कामगार यांच्या वतीने साखर कामगारांची स्वच्छता दिंडी १० जुलै रोजी दुपारी १.३० वाजल्यापासून संपूर्ण मार्ग स्वच्छता होईलपर्यंत काढण्यात आली.
ही दिंडी कारखाना परिसर व नाना पाटी चौक ते पंढरपूर रोड अशी जाऊन पालखी मार्गाची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता दिंडीत कारखाना चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक, अधिकारी, कामगार यांनी भाग घेतला.
श्रीराम जवाहर कारखान्याच्या या स्वच्छता दिंडीने केलेल्या कामामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
