
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सैतवाल जैन समाजाची शिखर संस्था असलेल्या अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी श्रीपाल जैन यांची एकमताने निवड करण्यात आली. आज ठाणे येथे संपन्न झालेल्या संस्थेच्या विशेष सभेत राष्टीय अध्यक्ष दिलीप घेवारे यांच्या हस्ते जैन यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे.
यावेळी संस्थेचे महामंत्री नितीन नकाते, राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजयकुमार लुंगाडे उपस्थित होते.
समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे, सैतवाल जैन समाजाची जनगणना करणे, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन समाजाची उन्नती करणे, शैक्षणिक कार्यास प्रोत्साहान देणे, अशी संस्थेची उद्दिष्ट्ये आहेत.
या निवडीबद्दल सर्व स्तरातून श्रीपाल जैन यांचे अभिनंदन होत आहे.
