![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2022/10/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-1.jpg?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । पर्यटन क्षेत्रात काम करणारे भागधारक यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय पर्यटन विभाग व राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे पर्यटन क्षेत्रातील भागधारकांशी चर्चा करताना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक बोलत होते.यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा,पर्यटन सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर, राज्यातील पर्यटन क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, पर्यटन वाढीसाठी पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करेल तसेच राज्यात या क्षेत्रात येणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारी धोरणे शासन अवलंबित आहे. चर्चेत सर्वांच्या अडचणी जाणून घेवून ठोस उपाययोजना करण्यात येतील, असेही यावेळी श्री. नाईक यांनी सांगितले.
पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर देणार : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
मंत्री श्री.लोढा म्हणाले, राज्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करून पर्यटन वाढीसाठी शासनाचे धोरण नेहमीच लवचिक राहील.या क्षेत्रातील प्रत्येकाच्या कल्पना जाणून घेवून याबात विचार करून निर्णय घेण्यात येईल, असेही पर्यटन मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.
यावेळी उपस्थित पर्यटन भागधारक ऋषभ मेहरा,अभय घाणेकर, निशा शेट्टी, प्रशांत अंधाळकर,राकेश मोरे,राजेश गाडगीळ, राजेंद्र फडके, ऋषीकेश यादव,गौरंग नायक,व्यंकटेशन दत्तात्रयन,ग्यान भूषण,चंदन भडसावळे,लोकेश सावंत,रेखा चौधरी यांनी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक बाबी याबाबत मते व्यक्त केली.