श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचा २० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचा २० वा वर्धापन दिन शनिवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सत्यनारायण पूजन, संस्थेच्या ध्वजाचे पूजन, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचा १९ वर्षांचा आढावा सादर केला. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मुलांना कृषि क्षेत्रातील उच्च शिक्षण घेता यावे, या उद्देशाने ४ नोव्हेंबर २००३ रोजी महात्मा फुले कृषि विद्यपीठांतर्गत फलटण येथे उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यात आले, २००३ पासून आजपर्यंत कृषि व उद्यानविद्या क्षेत्रात विकासाच्या अनेक पायर्‍या या महाविद्यालयाने चढल्या आहेत. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयात उद्यानविद्या शास्त्राशी संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविला जातो. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना उद्यान विद्या व कृषि क्षेत्रासंबधित शिक्षण, नवनवीन संशोधन व तंत्रज्ञान संबधित व्यावसायिक मार्गदर्शन, कृषि उद्योजिकता विकास व व्यवसाय, प्रगतशील शेती तसेच प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच महाविद्यालयाच्या बर्‍याच विद्यार्थ्यांची कृषि क्षेत्रासंबधित व्यवसाय, रोजगार व उच्चतम अधिकारी पदावर निवड झाली आहे.

महाराष्ट्रातील शेती संबधित व्यवसाय व उद्योग धंदे, प्रगतशील शेती तंत्रज्ञानात व प्रशासकीय सेवेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अधिकतम सहभाग व्हावा, या दृष्टीने महाविद्यालय कायम प्रयत्नशील राहील व अजून महाविद्यालयाचा विकास कसा होऊ शकतो, याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी महाविद्यालयाची शिस्त आणि हेतू बघता महाविद्यालयास एका उंचीवर नेऊ, असा विश्वास दिला.

सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन समितीचे निमंत्रित सदस्य श्री. राजाराम पवार, श्री. रणजित निंबाळकर, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे मे. गव्हर्निंग कौंसिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!