
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । फलटण । मौजे सासकल ता.फलटण येथे श्री.दिलीप नागू फडतरे यांची कन्या चि.सौ.का. गौरी व श्री. उत्तमराव आनंदराव पवार रा.सैदापूर यांचे चिरंजीव शेखर यांच्या शुभ विवाह प्रसंगी जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. यावेळी माजी सरपंच गणपत मुळीक, विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय रामचंद्र मुळीक, मा.ग्रामपंचायत सदस्य कमलाकर आडके, मा. सरपंच दत्तात्रय दळवी, सामाजिक कार्यकर्ते राजे गटाचे समर्थक दिनेश मुळीक, दिलीप नागू फडतरे व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी गावच्या विकासाबद्दल ग्रामस्थांशी चर्चा केली.
