
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 07 सप्टेंबर 2023 | फलटण | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामधून पुढे मार्गस्थ होणार आहेत. अजितदादांच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दि. 10 सप्टेंबर रोजी सातारा येथून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहेत. तरी त्यांच्या स्वागतासाठी सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये आज, गुरुवार दि. 07 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
